मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत राज्य सरकारच्या विविध विभागांतील ७२ हजार पदे दोन वर्षांत भरण्यात येणार असून यावर्षी ३६ हजार पदांसाठी भरती मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. विरोधकांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांविरोधातील चौकशी अहवालांचे काय झाले असा सवाल केला होता. लोकायुक्तांमार्फत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी सुरू असून लवकरच त्याचा अहवाल येईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मोठय़ाप्रमाणात राज्य सरकारतर्फे भरती मोहीम राबवण्यात येणार असून दोन वर्षांत ७२ हजार पदे भरण्यात येतील. यावर्षी ३६ हजार पदे भरण्यात येणार असून सार्वजनिक आरोग्य विभागात १० हजार ५६८, ग्रामविकास विभाग ११ हजार पाच, कृषी विभाग २५७२, पशु संवर्धन १०४७, मत्स्य विकास ९०, गृहविभाग ७१११, सार्वजनिक बांधकाम ८३३७, जलसंपदा व जलसंधारण मिळून १२ हजार ४५० पदे यांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
0 Comments