Hot Posts

6/recent/ticker-posts

मनसे नेते प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी म न से पदाधिकाऱ्यांना दिले संघटनात्मक बांधणीचे आदेश

आळेफाटा (वार्ताहार ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते(नेते) अविनाश अभ्यंकर हे सध्य पक्ष संघटनाच्या राज्य दौऱ्यावर आहेत 
ते सोमवारदि,२,रोजी दुपारी  जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी  म न से आमदार शरद दादा सोनवणे यांच्या "रायगड" या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांचा बैठीकेचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी त्यांच्या समवेत विजय रजपूत (माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष),संदीप पाचंगे, (ठाणा जिल्हा विदयार्थी सेना अध्यक्ष ),अनिल चितळे(अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख)समीर थिगळे(पुणे जिल्हा अध्यक्ष) उपाध्यक्ष दत्ता भाऊ शिंदे ,बस्सपा वळसंगे(वाहतूक सेना अध्यक्ष पुणे) आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके ,तालुका उपाध्यक्ष दिलीप खिलारी ,बस्सपा वळसंगे, बडुशेठ गटकळ, संगीता अडसरे, अविनाश कुमकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले 
यावेळी बोलताना 
पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले की, राज्यात २८८विधानसभा मतदार संघात  राज्यात मनसेचे एकमेव आमदार असताना देखील जुन्नर तालुका कृषी प्रधान असताना हा राज्यातील एकमेव तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात मोठे यश मिळविले आहे,
त्यामुळे शेतकरी कुटूंबातील तरुणांना पर्यटनामुळे उद्योगधंदे व रोजगार उपलब्ध झाला असून जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आपला माणूस आमदार शरद सोनवणे यांचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठे यश असल्याचेहि यावेळी त्यांनी सांगितले,
तसेच उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे यांनी सांगितले की, आमदार शरद दादा सोनवणे हे तालुक्यातील प्रत्येक मनसे कार्यकर्त्यांना आपल्या बरोबर घेऊन त्यांचे तालुक्यात पक्षाचे काम सुरू आहे तसेच कोणताही कार्यकर्ता आमदार साहेबांवर नाराज नसून मनसे पक्ष तालुक्यात चांगल्यापैकी काम करत असून   मनसे पक्ष संघटन वाढी साठी  जोरदार प्रयत्न चालू आहेत..
तसेच आणे पठार ,बेल्हा राजुरी,बोरी,आळेफाटा, वडगाव आनंद, जुन्नर नारायणगाव, पिंपळवंडी,खोडद,उदापुर, पिंपळगावजोगा, कोळवाडी, डिंगोरे, रोहोकडी,ओतूर,खामुंडी ,पिंपरी पेंढार, धनगरवाडी, आदी गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना, अडीअडचणी अविनाश अभयंकर यांनी जाणून घेतल्या
या वेळी बाबू आहेर। मधुकर गुंजाळ ,शिवाजी गुंजाळ,विठ्ठल कडस्कर, रामकृष्ण शिंदे,अविनाश कुमकर,संदीप गवारी,वैभव बटवाल,बाळासाहेब चकवे, प्रशांत खुडवे, वैभव कुमकर,सुनील शिंदे,आदी सह कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते 
यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी, कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन व जिल्हा अध्यक्ष ,उपाध्यक्ष,तालुका अध्यक्ष यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून कार्यवाहिच्या सूचनाही अभ्यंकर यांनी यावेळी  दिल्या. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप खिलारी यांनी केले तर आभार बडुशेठ गटकळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments