Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारला सत्तेचा माज आला ,राज ठाकरे

 मुंबई- भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे,आणि हा माज उतरायलाच हवा असे विधान मनसे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी केले आहे.त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर जोरदार टिका केलीय.अवनी टी-1 या वाघिणीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारवर सगळीकडून टिका होत असतांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्या वाघिणीला न मारता बेशुद्ध करून तिचे संवर्धन करायला हवं होतं अशी भूमिका मांडली आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की,फक्त पुतळे उभे करून वाघांचे संवर्धन होत नाही.त्यासाठी विशेष विशेष प्रयत्न सरकारने करायला लागतात.वनमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे काही वनतज्ज्ञ नाहीत;तर ते आज मंत्री आहेत,उद्या त्यांचे मंत्रिपद जाऊ शकते.परंतु,ज्या पद्धतीनं घडलेल्या प्रकरणावर ते उत्तरे देत आहेत ती अयोग्य व चुकीची आहेत.यामुळे,सत्येचा भाजपा सरकारला माज आला आहे.आगामी निवडणुका जास्त लांब नाहीत.त्यामुळे,राज्यातील लोकांनीच भाजपाचा माज उतरावा असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बोलताना केले.

Post a Comment

0 Comments