ओतुर : जुन्नर तालुक्यातील ओतुर पिंपरी पेंढार गटातील 30:54 व 50 : 54 च्या रस्त्यांसाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी एक कोटी तीन लक्ष चा भरीव निधी मंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली.

ओतुर पिंपरी पेंढार गटात
30:54 अंतर्गत प्रास्ताविक करण्यात आलेल्या रस्त्यांची नावे , खर्च पुढील प्रमाणे- फापाळे शिवार रस्ता 24 लक्ष रुपये, हिवरे खुर्द लोकेश्वर मळा रस्ता 24 लक्ष रुपये, उंब्रज नंबर 1 ते हांडे मळा रस्ता वीस लक्ष रुपये तसेच 50 : 54 अंतर्गत पिंपरी पेंढार गावठाण रस्ता 35 लक्ष रुपये, जि प सदस्य ढमाले यांच्या निधीतून मंजूर केल्याचे बॅंकेने सांगितले. येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रत्येक वाडी व वस्ती वरील रस्त्याचे काम उच्च दर्जाचे करणार असल्याचे बेनके यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य विशाल तांबे , रंजना काळे व जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले त्यांच्यामार्फत आपल्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम ओतुर पिंपरी पेंढार गटात चालले असल्याबद्दल बेनके यांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments