Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली

पाटण्यात 'राष्ट्र मंच'ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, तेजस्वी यादव, शरद यादव यांच्यासह जेडीयूमधील अल्पसंतुष्ट नेते सहभागी झाले होते. या बैठकीत भाजपविरोधी रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक आघाडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.आगामी कर्नाटक तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने यशवंत सिन्हांनी घेतलेला निर्णय भाजपला अडचणीत आणणारा ठरू शकतो.  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात सिन्हा यांनी अर्थमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. तत्कालीन पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील सिन्हा महत्वाचे नेते होते. सिन्हा यांनी वारंवार भाजपला लक्ष्य केले होते. तसेच पक्षावर नाराज असलेले सिन्हा कॉग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. 

Post a Comment

0 Comments