अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अजनी, फुलआमला येथील तलाव साठवण प्रकल्पामध्ये शेती गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने त्यांनी इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे त्यांनी निवेदन देऊन ही परवानगी मागितली आहे. याकरिता शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
होते.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुलआमला आणि अजनी गावातील ८१ शेतकऱ्यांच्या अंदाजे अडीचशे एकर जमिनी तलाव साठवण प्रकल्पामध्ये गेल्या होत्या. सदर जमिनी अधिग्रहित करीत या शेतकऱ्यांना केवळ एकरी अडीच लाख रुपये दिले होते. इतर मोबदला देण्याचे आश्वासन देऊन चार वर्ष होत असताना शासनाने या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती आली आहे. याकरिता कित्येकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु याची दखल न घेतल्याने दोन्ही गावातील शेकडो प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. यावेळी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी मागितली. येत्या १५ दिवसात जर आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर या प्रकरणावर न आल्यास आपण इच्छा मरणाची परवानगी दिली आहे, असे समजण्यात येईल असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या प्रकरणावर काय तोडगा काढते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

0 Comments