Hot Posts

6/recent/ticker-posts

मी बोलायला लागलो तर पंतप्रधान संसदेत थांबूच शकणार नाही


 नवी दिल्ली - राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांसोबत जनतेशी संवाद साधत आहे.देशभरातील एटीएममध्ये निर्माण झालेल्या चलन तुटवड्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. संसदेत बोलण्यासाठी १५ मिनिटे मिळायला हवी. मी बोलायला लागलो तर पंतप्रधान संसदेत थांबूच शकणार नाही, असा घणाघात गांधी यांनी केला आहे.पंतप्रधान मोदी यांनी बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले आहे. आर्थिक घोटाळ्यांवर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. नीरव मोदी पैसे घेवून पसार झाला आणि सामान्य नागरिक मात्र पैशासाठी रांगेत ताटकळत उभे आहेत. आमच्या खिशातील नोटा काढून सरकारने नीरव मोदीच्या खिशात घातल्याचा आरोप केला. 

Post a Comment

0 Comments