Hot Posts

6/recent/ticker-posts

खा. वंदना चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

पुणे:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी माजी शहराध्यक्षा आणि राज्यसभेच्या सदस्य अ‍ॅड. वंदना चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश पातळीवरील चार प्रवक्त्यांसह राज्यातील ३१ प्रवक्त्यांचे पॅनल जाहीर केले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी सहा जणांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पाटील यांनी प्रदेश पातळीवरील आपली टीम निवडण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या ३१ प्रवक्त्यांच्या पॅनेलची घोषणा केली. ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करत प्रदेश पातळीवरील प्रवक्ते म्हणून अ‍ॅड. वंदना चव्हाण, हेमंत टकले, संजय खोडके यांची निवड जाहीर केली आहे

Post a Comment

0 Comments