Hot Posts

6/recent/ticker-posts

ट्रॅफिक हवालदाराला तरुणाने गचांडी पकडून मारहाण

उल्हासनगर, दि. 19 – उल्हासनगरमध्ये एका ट्रॅफिक हवालदाराला तरुणाने गचांडी पकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तरुणाला अटक करण्यात  आली आहे.
उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी उपविभाग वाहतूक शाखेत कार्यरत रावसाहेब काटकर आपले ओटी चौक परिसरात रोड वर कर्तव्य बजावत असताना, एका मोटारसायकलवर तीन व्यक्ती बसून भरधाव प्रवास करत होते. त्या वेळी काटकर यांनी मोटरसायकल थांबवली. या प्रकाराचा राग मनात धरून मोटरसायकल चालकाने काटकर यांना कानशिलात बजावून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाचे नाव आप्पा मुंढे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments