चंदननगर परिसरात बुधवारी गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यावेळी रेडिसन हॉटेलसमोरील रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या होंडासिटी कारने काही वाहनांना धडक दिली. त्याच ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या शांताबाई आणि नयन यांनादेखील कारने धडक दिली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघांचाही मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चंदननगर पोलिसांनी होंडासिटी कारच्या अज्ञात चालकाविरोधात बेदरकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments