Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतमजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

पुणे – साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांनी शेतमजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना हिंजवडी जवळ घडली होती. या दोन मुलींपैकी एका मुलीची प्रकृती गंभीर आहे तर दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी गणेश निकम याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार
, रविवारी शाळेला सुट्टी असल्याने हिंजवडी जवळ राहणाऱ्या शेतमजुरांच्या दोन मुली घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्या मुलींना त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्यातील मजुराच्या दोन मुलांनी मिळून चॉकलेटचे आमिष दाखविले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितले. दोघीही चॉकलेट मिळणार म्हणून मंदिराच्या मागे गेल्या. आरोपींनी त्यावेळी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेले. तिथे त्यांच्यावर बलात्कार केला. त्यातील एका मुलीवर दोघांनी मिळून बलात्कार केला. त्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला. त्यांना मानसिक आणि शारीरिक इजा झाली. दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांना घडलेला प्रसंग समजला तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. त्यांनी सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास नकार दिला, पण त्यांना पोलिसांनी विश्वास दिल्यामुळे मुलीच्या आईने तक्रार दिली. एक पीडित मुलगी बोलू शकत असल्याने तिच्या मदतीने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकजण सज्ञान असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments