मुंबई, दि. 19 (वृत्तसंस्था) : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या वापराला परवानगी द्यावी आणि त्यावर घातलेली बंदी उठवावी यासाठी दाखल झालेल्या याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा मिळाला नाही. दरम्यान, या बंदीवर राज्य सरकार ठाम असल्याचेही स्पष्टझाले आहे. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्या डीजे आणि डॉल्बीला परवानगी देणे अशक्यच आहे, अशी भूमिका सरकारने उच्च न्यायालयात मांडली.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या वापराला परवानगी द्यावी आणि त्यावर घातलेली बंदी उठवावी यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. गणेशोत्सवातील गोंगाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे व डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारल्याच्या विरोधात प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटनिंग असोसिएशनने ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याबाबत जोरदार युक्तिवाद केला. पोलिसांनी डॉल्बी व डीजेला परवानगी नाकारण्यापूर्वी कोणताही अभ्यास केलेला नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणारे फटाके वाजवणार्यांवर यापूर्वी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत का? जाहीर सांगितिक कार्यक्रमांमध्ये आणि इनडोअर कार्यक्रमांमध्ये डीजे व डॉल्बीला परवानगी दिली जाते. मग सार्वजनिक ठिकाणीच बंदी का, असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. मात्र, या मागणीला राज्य सरकारने ठामपणे विरोध केला.
ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणार्या डीजे आणि डॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्यच नाही, असे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बी वाजवणार्या मंडळांवर पोलीस केवळ कारवाई करू शकतात. त्यांना रोखू शकत नाहीत, असेही सरकारने न्यायालयाला सांगितले. वर्षभरात ध्वनी प्रदूषणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमधील 75 टक्के प्रकरणे डीजेची आहेत, अशी माहितीही राज्य सरकारने न्यायालयाला दिली. त्यावर डीजे आवाजाची मर्यादा ओलांडणार नाहीत, असे आश्वासन याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिले. मात्र, यावरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला. न्यायालयात याबाबत दावा केला जातो; पण प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही आणि हे सर्वांनाच माहिती आहे, असे मत व्यक्त करत न्यायालयाने तूर्तास डीजे आणि डॉल्बीबाबत कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीचा वापर करण्यास मनसेप्रमुख राज ठाकरे आणि सातार्याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला आहे. न्यायालयाचा अवमान झाला तरी मला पर्वा नाही. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच, असे म्हणत खा. उदयनराजे यांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनीही डीजे आणि डॉल्बीसंदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पाठराखण करताना मंडळांची सहमती असेल तर खुशाल डीजे वाजवा, असे म्हटले आहे. त्याच वेळी डीजे बंदीचे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असल्याने पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्यांना केले आहे.

0 Comments