मुंबई : ऐन गणेशोत्सवात शहरात दूधभेसळीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात मालाड येथील कारवाईनंतर बुधवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने खार येथे छापा टाकला. येथे दुधात भेसळ करणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून ४५० लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत करण्यात आले.
खार पश्चिमेकडील दांडपाडा परिसरातील चवकुटे चाळीमध्ये दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट आठच्या अधिकाऱ्यांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मागर्दर्शनखाली पोलिसांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पहाटे याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी विविध नामांकित कंपनीच्या दुधाच्या पिशव्या फाडून त्यात भेसळ करताना चौघे रंगेहाथ सापडले. व्यंकटेश गुंडाला, सविता कर्नाटकी, यादगिरी नागेली आणि अनंत रेड्डी अशी त्यांची नावे आहेत. भेसळयुक्त दुधासह अमूल कंपनीच्या नावाचे छापलेल्या ५० रिकामी पिशव्या, भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि भेसळयुक्त दूध ने-आण करण्यासाठी वापरली गेलेली रिक्षाही पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतली.
0 Comments