5कराड, दि. 17 : कराडमध्ये पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या इंद्रजित माणिक सोनवणे (वय 19, रा. वाघज, ता. बारामती) याला कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
याबाबत माहिती अशी, इंद्रजित सोनवणे हा कराड येथे विनापरवाना पिस्तूल विकायला आला होता. याबाबत माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने सापळा रचून सोमवारी दुपारी अडीच वाजता शनिवार पेठेतील चंदूकाका सराफ दुकानासमोर, खोडजाईदेवी मंदिरानजीक, कॅफे विहार येथे त्यास पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये खिशात अमेरिकन बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे सापडली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक शेलार, सहाय्यक फौजदार राजेंद्र राऊत, हवालदार बी. आर. जगदाळे, अरुण दुबळे, पोलीस नाईक संतोष चव्हाण, जमादार, प्रवीण पवार, संदीप पवार, रामदास कांबळे, इमरान पटेल, सागर बर्गे, विजय माने, सौरभ कांबळे, रमेश बरकडे, चंद्रकांत
पाटील, रवींद्र चव्हाण यांनी ही कारवाई केली. पोलीस
अधीक्षक पंकज देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी या पथकाचे अभिनंदन केले.
0 Comments