Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा



पुणे - शहरातील जुना बाजार चौकात शुक्रवारी झालेल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका रेल्वे अधिकाऱ्यासह दोघांना अटक केली आहे. संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी या दोघांची नावे आहेत.
संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे. तर पांडुरंग वनारे हा रेल्वेत लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डिंग काढण्याचे काम करत होते. मात्र, होर्डिंग वरच्या बाजूने कापण्याऐवजी त्यांनी ते खालच्या बाजूने कापण्यास सुरुवात केली होती. या घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये होर्डिंग पडतेवेळी होर्डिंगखाली असलेली व्यक्ती उठून पळताना दिसते आहे. तो पांडुरंग वनारे अशी माहिती समोर आली आहे.या घटनेसंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी २ खासगी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यालाही अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी जुना बाजार चौकात रेल्वेच्या हद्दीत असलेले जाहिरातीचे मोठे होर्डिंग हटवण्याचे काम खासगी ठेकेदाराच्या मार्फत रेल्वेकडून करण्यात येत होते. मात्र, हे जोखमीचे काम करत असताना मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करण्यात आला आहे. कुठल्याही सुरक्षेच्या उपायोजना न करता हे होर्डिंग कापण्यात आले होते. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण गंभीर जखमी झाले.  होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय गंभीर जखमींना १ लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.


Post a Comment

0 Comments