अहमदाबाद- गुजरात साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारी लाेकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या अाहेत. गेल्या पाच दिवसांत ४२ परप्रांतीयांवर हल्ले झाले. त्यामुळे तब्बल अाठ हजार लाेकांनी जीव मुठीत धरून या राज्याबाहेर पलायन केले. परप्रांतीयांवर संतापाचे पडसाद माेठ्या प्रमाणावर उमटले. हल्ले करणाऱ्या ३४२ लाेकांना पाेलिसांनी अटक केली अाहे.
साबरकांठाजवळील हिंमतनगरमध्ये २८ सप्टेंबर राेजी १४ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले हाेते. या प्रकरणात अाराेपी असलेल्या एका बिहारी युवकाला पाेलिसांनी अटक केली हाेती. या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांना राज्याबाहेर काढण्यासाठी गुजरातेत अांदाेलने सुरू झाली अाहेत.
शनिवारी रात्री वडाेदरा हायवेजवळील जराेद गावात एका कंपनीवर जमावाने हल्ला केला. यात १० कामगार जखमी झाले. धारदार शस्त्र व काठ्या-लाठ्या घेऊन कंपन्यांत घुसलेल्या लाे
कांनी परप्रांतीयांवर हल्ला करून रविवारी सकाळपर्यंत हा इलाका साेडण्याची धमकी दिली.

0 Comments