Hot Posts

6/recent/ticker-posts

धोलवडमध्ये राममंदिर परिसर सुशोभीकरण व पेवर ब्लॉक बसवणे या कामाचे अतुल बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन

  धोलवड -:    विविध विकास कामांचे भूमिपूजन निमित्त महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके   धोलवड  या ठिकाणी राम मंदिर परिसर सुशोभीकरण व पेवर ब्लॉक बसवणे या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी   धोलवड  या ठिकाणी आले होते .
या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना ते म्हणाले की महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या छायेत असून पुणे जिल्ह्यातील आपला जुन्नर तालुकाही पाच धरणे असून दुष्काळाच्या छायेत आहे.  त्यामुळे पाण्याचे नियोजन सर्व शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने करावे पर्जन्यमान मापक गुगल यंत्रणेने सुरुवातीला झालेल्या पावसाची नोंद जास्त दाखवली मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांनी स्थानिक गाव, वस्त्यांचा सर्वे करून पाण्याची खरी परिस्थिती शासनाला सादर करणे आवश्यक होती.  ती लोकप्रतिनिधींकडून झाली नसल्यामुळे आपला तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आला लवकरात लवकर जुन्नर तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, आपण सर्वतोपरी प्रयत्न माननीय अजितदादा पवार यांच्यामार्फत करणार असल्याचे बेनके यांनी सांगितले, यापुढील काळात पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार असून त्यासाठी कुणीही पाण्याचे राजकारण न करता तालुक्यातील प्रत्येक त्याला कसे पाणी मिळेल याचे नियोजन करावे.  यावेळी त्यांनी राम मंदिर परिसर सुशोभीकरण व पेवरला बसवणे या कामाचे उद्घाटन केले व येत्या आठ दिवसात  पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले .
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य मोहित ढमाले उपस्थित होते.  त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले की  धोलवड  साठी तेरा कामे मंजूर केली असून ती लवकरात लवकर पूर्ण केली जातील.  यावेळी पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, माजी पंचायत समिती सदस्य गणपत कवडे ग्रामविकास चे ट्रस्ट अध्यक्ष मिलिंद नलावडे ,राम मंदिर हरी नाम सप्ताह अध्यक्ष नरेंद्र नलावडे ,राष्ट्रवादी जुन्नर सचिव सुभाष मुंढे ,  राजे प्रतिष्ठान जुन्नर तालुका अध्यक्ष सचिन (पिंटू) नलावडे , ग्राम विकास ट्रस्टचे सचिव राजेंद्र नलावडे,  उपसरपंच सोमनाथ नलावडे ,पोर्णिमा भोर , योगेश नलावडे, कैलास नलावडे (गुरुजी) दामू (अण्णा) नलावडे, सुरेश मुंढे , मिलिंद नलावडे ,भगवान नलावडे ,सुरेश नलावडे ,एकनाथ नलावडे ,अनिल लांडगे ,सचिन नलावडे ,मुरली नाना मुंढे  व साप्ताहिक ग्राम शासन चे संपादक ऋतुराज नलावडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments