Hot Posts

6/recent/ticker-posts

नगर-पुणे महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात,५ जण जागीच ठार

अहमदनगर - नगर-पुणे महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्य
ता आहे. औरंगाबादहुन पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
शिरूर जवळील वाडेगव्हान येथे पहाटे ५.३० ला हा अपघात झाला. औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात प्रचंड भीषण होता. भरधाव बसची धडक बसताच ट्रक उलटला. त्यामुळे बसमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यातील तीनजण गंभीर जखमी आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य करत आहेत. बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
पोलीस आणि डॉक्टर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. बसखाली आणखी प्रवासी दबले असण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments