जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवछत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जुन्नरच्या महाराष्ट्र शिवाजी राव महादेवराव तथा दादासाहेब काळे या नवीन वर्ग खोल्या व इमारतीचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी डी एन ए लॅब चे ही उद्घाटन करण्यात आले यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर व्यासपीठावर होते तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय काळे यांनी विद्यालया बद्दल इथंभूत माहिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख त्यांनी आलेल्या पाहुण्यांना सांगितला तसेच जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत बांधण्याची संकल्पना त्यांनी आलेल्या पाहुण्यांना सांगितली तसेच त्यांनी तालुक्यातील सर्व नेत्यांना उद्योगपतींना आव्हान केले की तुम्ही तुमच्या आई वडील यांच्या नावे खोलीच्या बांधकामाची रक्कम संस्थेला द्या तुमच्या आई वडिलांचे नाव त्या खोलीला देण्यात येईल असे त्यांनी मनोगतात सांगितले यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व संस्थांचा संस्थेचा उल्लेख केला. तालुक्यातील शैक्षणिक दर्जा व तालुक्यातील शैक्षणिक संस्थांचे महत्त्व त्यांनी सविस्तर सांगितले मी मनसेचा एकमेव आमदार असून जनतेसाठी जनतेसाठी अहोरात्र आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले सोनवणे यांनी अजित पवारांना उद्देशून असे म्हटले की दादा पुणे जिल्हा परिषद आपल्यात ताब्यात आहे. आपण जिल्हा परिषदेचे सर्वेसर्वा आहात त्यामुळे येणाऱ्या कालखंडात जुन्नर तालुक्याला महत्त्वाचे एखाद्या जिल्हा परिषदेचे पद द्यावे माझे व अतुल बेनकेचे काही वैर नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी मनसे काँग्रेस राजू शेट्टी या सर्वांची महाआघाडी होऊ शकते. त्यामुळे मला जर विधानसभेवर पाठवलं तर अतुल बेनके यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार करावे सोनवणे पुढे असे म्हणाले की गेली 75 वर्षात जुन्नर तालुक्याला कुठलेही मंत्रीपद भेटले नाही.ते आपल्या सहकार्याने किमान राज्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी त्यांनी केली यानंतर त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपले मनोगत संपवले यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी छत्रपती महाविद्यालयाचा विशेष अभिनंदन केले तसेच अमृतसरला रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहिली आपल्या राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट येऊन पण पडले आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या गरजा,चैनी कमी करून कुटुंबाकडे लक्ष द्यावे असा सल्ला उपस्थितांना त्यांनी दिला. पवार सोनवणे ना उद्देशून म्हणाले की तुम्ही नेहमी म्हणता की मी मनसेचा एकटा आमदार आहे,त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे तुम्ही योग्य त्या कळपात घुसा असा सल्ला दिला.
तसेच जिल्हा परिषदेच्या अडीच वर्षात जुन्नर ला निश्चित पद देऊ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले तसेच त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांचे व अध्यक्ष संजय काळे व संचालक मंडळ यांचे विशेष अभिनंदन केले सध्याचे सरकार हे शेतकरी विरोधी असून एवढा दुष्काळ पडला असता नाही दुष्काळ जाहीर करत नाही त्यामध्ये जुन्नर चा समावेश करत नाही. साताऱ्यातील खटाव तालुकाचा समावेश करत नाही किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नंतर हे सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे, हे समजत नाही सरकारने ज्या शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी गेली त्यांना तात्काळ पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी असे अजित पवार यांनी सरकारकडे मागणी केली यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे ,जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नाना देवकाते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखाना चे चेअरमन सत्यशील शेरकर ,जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी चे गटनेते शरद लेंडे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले ,जुन्नरच्या सभापती ललिता चव्हाण ,पंचायत समिती सदस्य विशाल भाऊ तांबे,उद्योगपती किशोर शेठ दांगट, उद्योजक अमित शेठ बेनके, उद्योजक जालिंदर पानसरे ,उद्योजक प्रेमानंद आस्वाद ,राजे प्रतिष्ठान जुन्नर तालुकाअध्यक्ष सचिन (पिंटू) नलावडे हे उपस्थित होते.
0 Comments