Hot Posts

6/recent/ticker-posts

राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधून दाखवू ,उद्धव ठाकरे

शिवसेनेचे कार्याध्यक्ष
उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले की भाजपाने सांगितले होते आमची सत्ता येतात मंदिर बांधू पण गेली चार वर्षात काहीच झाले नाही म्हणून मी येणाऱ्या 25 नोव्हेंबरला स्वतः मी उद्या जाणार आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारणार राम मंदिर तुम्ही  बांधता की आम्ही बांधून दाखवू असा इशारा ठाकरे यांनी दिला
                                          शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते . उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले ," पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर हिंडतात . अमेरिका , जपान , रशिया एवढेच काय भूगोलाच्या पुस्तकात नकाशावरही लवकर न सापडणाऱ्या देशांना हे जाऊन आले . पण गेल्या चार वर्षात एकदाही अयोध्येला हे गेले नाहीत . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे मी अभिनंदन करतो , त्यांनी राम मंदिर कधी बांधणार हा मुद्दा उपस्थित केला आहे . मंदिर वही  बनायेंगे म्हणत यांनी सभा घेतल्या , यात्रा काढल्या . पण पुढे काही नाही. लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती करायचे तर त्यावेळी नेमकी बाबरीची फाईल न्यायालयात वर येतेबाबरी  मशीद शिवसैनिकानीं  पाडली याचा पुनरुच्चार करीत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले , " बाबरी मशीद  पडल्यानंतर हे शेपटी घालून पळाले . बिळात जाऊन ठाकले . देशद्रोह्यांचा आगडोंब उसळला होता तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांचा सामना केला होता हा इतिहास आहे . तुम्ही राम मंदिर बांधणार की नाही ते सांगा . नाही तर हा देखील चुनावी जुमला होता हे कबुल करा . तुम्ही बोलत नाही पण मी २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार  आहे . तुमचा पराभव व्हावा अशी आमची इच्छा नाही पण तुम्ही दिलेली आश्वासने पाळा  असा आमचा आग्रह आहे  दसरा मेळाव्यात इतक्या तीव्रपणे स्वबळाचा नारा दिला गेला नाही. उलट ठाकरे यांनी महागाई कमी करण्याच्या मुद्यासोबतच देशात ३७० कलम रद्द करण्याचा मुद्यावर लोकसभेत पाठिंबा देऊ, असेही जाहीरपणे सांगितले. 

Post a Comment

0 Comments