
मुंबई – रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यावर्षीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या मराठी रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबरला त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. मोहन आगाशे यांना १९९६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, गौरवपदक आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मागील अनेक वर्षांपासून रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिग्गज कलाकारांना मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराने गौरवण्यात येतं.
0 Comments