आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पक्षाच्या पदाधिका-यांसोबत आढावा बैठक घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्त हर्डीकर यांच्या तक्रारींचा पाढा पवार यांच्याकडे वाचला. आयुक्त भाजपचे प्रवक्ते, घरगडी असल्यासारखे कामकाज करतात. राष्ट्रवादीच्या नगरसवेकांची कामे अडवितात. दुजाभाव करतात, अशी गाऱहाणी मांडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी आयुक्त हर्डीकर यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविला.
पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची २० वर्ष सत्ता होती. आम्ही सत्तेच्या काळात विरोधकांची कामे कधीच अडविली नाहीत. विरोधकांना नेहमीच मानसन्मान दिला. निधीची कमतरता पडू दिली नाही. तसेच अधिकारी देखील कामे अडवित नव्हते.
आम्ही विरोधकांची कामे करण्याबाबत आयुक्तांना सूचना देत होतो असे सांगत पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना श्रावण हर्डीकर यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. चांगले काम करत होते. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा होती. परंतु, पिंपरी महापालिकेत आल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे.

आयुक्तांकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबत दुजापणा केला जातो. विरोधक देखील जनतेचे लोकप्रतिनिधी असतात. त्यामुळे भेदभाव करणे चुकीचे आहे. विरोधकांना मानसन्मान दिला जात नाही. निधी कमी दिला जातोय. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन केल्यास राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले जातात. आयुक्तांनी भेदभाव करणे चुकीचे आहे. असे पवार यांनी आढावा बैठकीत आयुक्तवर निशाणा साधला.
0 Comments