सैन्य व पोलिस बंदोबस्तात कर्फ्यूदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू
काठमांडू : आपल्या शेजारच्या देशात म्हणजे नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून, काठमांडूत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संसद परिसर व नेत्यांच्या घरांवर हल्ले, जाळपोळ आणि तोडफोडीनंतर किमान १९–२२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांनी दिली .पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, सध्या नेपाळचा कारभार लष्कराच्या हाती आहे..
काय घडले?आंदोलनाचे स्वरूप: सुरुवातीला सोशल मीडियावर बंदीच्या विरोधात सुरू झालेले आंदोलन नंतर सरकारच्या भ्रष्टाचार, नातेवाईकवाद आणि आर्थिक असमानतेच्या मुद्द्यांवरून पेटले.
हिंसक घटना: आंदोलनकर्त्यांनी राजधानी काठमांडूमध्ये संसद भवन, सरकारी इमारती आणि नेत्यांच्या घरांवर हल्ले केले, तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड केली.
मृत्यू आणि जखमी: या हिंसक चकमकींमध्ये किमान १९ ते २२ लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
राजीनामा आणि पलायन: वाढत्या जनक्षोभामुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी राजीनामा दिला. तसेच राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला आहे. काही मंत्र्यांनी देश सोडून पलायन केल्याचेही वृत्त समोर आले आहे. काठमांडूत सध्या कर्फ्यू लागू असून प्रमुख सरकारी इमारती व संसद परिसरावर लष्कर तैनात आहे. सैन्य व सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.तणावपूर्ण शांतता: सध्या शहरात एक तणावपूर्ण शांतता आहे. दुकाने बंद आहेत आणि नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तुरुंगातून पळालेले कैदी: हिंसक आंदोलनाचा फायदा घेत नेपाळच्या काही तुरुंगातून कैदी फरार झाले आहेत. काही कैदी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना सीमावर्ती भागात भारतीय सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती भेटत आहे .
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना नेपाळला अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. काठमांडूत असलेल्या भारतीयांना घरात राहण्याचे व दूतावासाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन क्रमांक (भारतीय दूतावास, काठमांडू):
- 📞 +977-980 860 2881 (WhatsApp)
- 📞 +977-981 032 6134 (WhatsApp) सध्या नेपाळमध्ये नव्या नेतृत्वाची अनिश्चितता कायम आहे. लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत
1 Comments
God help nepal
ReplyDelete