गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला होता. महापुराने अनेकांचा बळी घेतला, कोट्यवधींचे नुकसान झाले. कुटुंबच्या-कुटुंब बेघर झाली आहेत. केरळमधील ही परिस्थिती अंगावर काटा आणणारी असून या पुरग्रस्तांना आता खरी मदतीची गरज
आहे. दरम्यान आता देशभरातून केरळमधील पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे येत आहेत.
आहे. दरम्यान आता देशभरातून केरळमधील पुरग्रस्तांना मदतीचा हात पुढे येत आहेत.
पूरग्रस्तांना सर्वजण आप-आपल्या परीने मदत करत असून, आरोग्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा ओघ केरळच्या दिशेने वाढला आहे. या मदतीच्या अवाहनाला साद देत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. लांडगे यांनी दोन टन कांदा खरेदी करुन केरळ पूरग्रस्तांना पाठविण्यासाठी पिंपरीतील चर्च ऑफ गॉड यांच्याकडे सुपूर्द केला. चर्चने देखील रात्रीच हा कांदा केरळकडे रवाना केला आहे. केरळातील अलेप्पी, चेंगणूर, पतनमतीट्टा या जिल्ह्यातील नागरिकांना हा कांदा देण्यात येणार आहे.
0 Comments