ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरूषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
शालीन व्यक्तिमत्त्व हरपले – विद्यासागर राव
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते. ते एक परिपूर्ण संसदपटू, द्रष्टे मुत्सद्दी, अमोघ वक्ते तसेच सुहृद व्यक्ती होते.
भीष्मपितामह गमावला – उद्धव ठाकरे
अटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी आपल्या शोकसंदेशात असे म्हटले आहे की, अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्मपितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्वास सांष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत. शिवसेना परिवार त्यांना मानवंदना देत आहे. अटलजी, तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.
अजातशत्रू लोकनेता गमावला – अशोक चव्हाण
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मूल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
महान पर्वाचा अस्त – धनंजय मुंडे
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातल्या एका महान पर्वाचा अस्त झाला आहे. देशाचं लाडकं, सर्वमान्य नेतृत्वं आपण गमावलं आहे. अटलजी राजकारणातील आदर्शपुरुष होते.
सत्तारुढ व विरोधकांमधील समन्वयानं त्यांनी भारतीय राजकारणाला, लोकशाहीला उंची प्राप्त करुन दिली, त्यांच्यासारखा सर्वमान्य नेता पुन्हा होणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रसूर्याचा अस्त – अजित पवार
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं राष्ट्रसूर्याचा अस्त झाला आहे. उच्च नैतिकमूल्ये व वैचारिक अधिष्ठान असलेलं राष्ट्रीय नेतृत्वं आपण गमावलं आहे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय राजकारणातील एक तत्त्ववादी पर्व संपले – विखे-पाटील
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

0 Comments