Hot Posts

6/recent/ticker-posts

मशीद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमानी मुंबईकरांना मानसिक त्रास सहन करावा लागला हार्बर मार्गावरील

मशीद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आले. रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. दुरूस्तीच्या कामाला काही वेळ लागल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.दरम्यान, पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे.
गेल्या आठवड्यात सकाळीच हार्बर रेल्वे मार्गावर सीवूड्स ते बेलापूर स्थानकादरम्यान अप मार्गावर रुळाला तडे गेल्याची घटना घडली होती. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.हळूहळू पूर्वपदावर वाहतूक येत आहे . 

Post a Comment

0 Comments