Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

🪔 🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात सुख, शांतता आणि समृद्धीची उजळ दिवे पेटवा.
आनंदाने व प्रेमाने उजळो तुमची दिवाळी!

23 वर्षीय तरुणाला OpenAI प्रोजेक्टमधून महिन्याला 20 लाखांचा पगार

 छोट्या शहरांतील तरुणांनाही जागतिक स्तरावर उच्च पगाराच्या संधी मिळू शकतात.

नवी दिल्ली | ईशान्य भारतातील एका 23 वर्षीय तरुणाने चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर OpenAI शी संबंधित रिमोट प्रोजेक्ट मिळवून महिन्याला तब्बल 20 लाख रुपये कमावले. त्याची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर सर्वत्र  चर्चेत आहे.माध्यमांच्या वृत्तानुसार, या तरुणाने B.Tech (कॉम्प्युटर सायन्स) पूर्ण केल्यानंतर त्याला केवळ 3.6 लाख रुपये वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली होती. मात्र, मर्यादित संधींवर न थांबता त्याने परदेशी रिमोट जॉब्ससाठी अर्ज करण्यास सुरुवात केली.  

              ५०० वेळा नकार, तरीही हार मानली नाही   

रोजगार शोधाच्या प्रवासात त्याला तब्बल 500 हून अधिक अर्जांमध्ये नकार मिळाले. तरीही सातत्य सोडले नाही. प्रत्येक अर्ज खास तयार करून, भूमिकेशी जुळणारे कौशल्य दाखवत तो प्रयत्न करत राहिला. अखेर त्याला OpenAI-लिंक्ड प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली.या प्रोजेक्टमधून त्याला दरमहा सुमारे 20 लाख रुपयांचे मानधन मिळाले. हा करार काही महिन्यांचा होता आणि ऑगस्टमध्ये संपला. सध्या हा तरुण स्वतःचा टेक स्टार्टअप सुरू करण्याच्या तयारीत आहे.

Reddit पोस्टने व्हायरल झाली यशोगाथा या तरुणाने स्वतःची गोष्ट Reddit वर शेअर केली. त्याने सांगितले की "मी आठ महिने वाट पाहत न बसता परदेशी नोकऱ्यांसाठी अर्ज केला. प्रत्येक अर्ज वेगळा तयार केला आणि यश मिळवले." ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याची कथा प्रेरणादायी ठरली आहे. आपले प्रोजेक्ट्स आणि काम ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नियमितपणे शेअर करा, जेणेकरून संभाव्य एखांदी संधी तुम्हाला भेटेल .









Post a Comment

0 Comments