चाफेकर बंधू देशाकरीता शहीद झाले.
१८९७ मध्ये पुण्यात भीषण प्लेगची साथ पसरली होती. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी कठोर आणि अमानुष उपाययोजना राबवल्या. घरात घुसणे, स्त्रियांचा अपमान करणे आणि लोकांची सार्वजनिक तपासणी करणे या पद्धतींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना चाफेकर बंधूंनी प्लेग कमिशनर डब्ल्यू.सी. रँड आणि त्याचा लष्करी एस्कॉर्ट लेफ्टनंट आयर्स्ट यांचा गोळ्या घालून हत्या केली .
वासुदेव चाफेकर यांची या हत्याकांडातील प्रमुख भूमिका असल्याचे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या साक्षी आणि कागदपत्रांतून सिद्ध झाले. त्यानुसार त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ८ मे १८९९ रोजी वासुदेव हरी चाफेकर यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. त्यानंतर महादेव विनायक रानडे (१० मे १८९९) आणि बाळकृष्ण हरी चाफेकर (१२ मे १८९९) यांनाही फाशी झाली.
वासुदेव चाफेकर यांच्या धाडसी कृतीने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रत्यक्ष शस्त्र उचलण्याची हिंमत दाखवणारे ते पहिल्या क्रांतिकारकांपैकी होते. त्यांच्या बलिदानामुळे अनेक भारतीय युवकांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली.वासुदेव चाफेकर आणि त्यांचे सहकारी हे भारतीय क्रांतिकारक इतिहासातील तेजस्वी प्रेरणास्त्रोत ठरले. त्यांचा त्याग हा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या धाडसी बलिदानाने स्वातंत्र्याच्या वाटचालीला दिशा दिली. आजही त्यांचे स्मरण प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात अभिमान, प्रेरणा आणि दृढनिश्चय निर्माण करते. अशा या महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन .
4 Comments
Bharat Mata ki Jay , Jay hind
ReplyDeleteमोठं त्याग बंधुंचा आपल्यासाठी
ReplyDeleteविनम्र अभिवादन
ReplyDeleteविनम्र अभिवादन
ReplyDelete