Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

🪔 🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात सुख, शांतता आणि समृद्धीची उजळ दिवे पेटवा.
आनंदाने व प्रेमाने उजळो तुमची दिवाळी!

संघ की शताब्दी उत्सव में सरसंघचालक भागवत के विचार: हिंदू एकता, राष्ट्रनिर्माण और बदलती वैश्विक व्यवस्था पर जोर

 नागपुरनागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देश, समाज आणि मानवतेच्या नव्या आयामांविषयी विचार मांडले. त्यांच्या भाषणातून समाज, देश आणि हिंदू एकतेच्या दिशेने गंभीर प्रेरणा मिळते


हिंदू समाजाची एकता – काळाची गरज

आजच्या काळात हिंदू समाजाचे संघटन हीच खरी आवश्यकता आहे, असे भागवत यांनी ठामपणे सांगितले. फक्त शब्दांमध्ये नव्हे, तर आपल्या वागणुकीत आणि व्यवहारात एकतेचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. धर्म म्हणजे केवळ खानपान किंवा परंपरा नव्हे; त्यात सर्वांना जोडण्याची आणि एकत्रित करण्याची सुंदरता आहे. जर आपण सकारात्मक मूल्ये आचरणात आणली तरच समाज मजबूत होईल.नव्या जागतिक व्यवस्थेत भारताची भूमिका
जगभरात बदलांची लाट आली आहे, आणि भारताला केवळ आर्थिक किंवा सैन्यशक्तीचे केंद्र नव्हे, तर आदर्श समाजाचा नमुना बनवायचे आहे. आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशातूनच इतर देशांना नवीन दिशा देता येईल. भारताने स्वतःचा विकास मॉडेल जगासमोर मांडावा, असे त्यांनी आव्हान दिले.
सज्जन शक्तींची जागरूकता – समाजाची कणा
समाजात अस्थिरता किंवा एखाद्या घटकावर अन्याय झाल्यास सज्जन शक्तींनी पुढे यावे.
कायदा हातात घेणे योग्य उपाय नाही, उलट त्यातून अराजकता वाढते. खरा बदल तेव्हाच येतो, जेव्हा चांगले लोक जागरूक रहातात, शांतता आणि सद्भाव राखतात.
राष्ट्रनिर्माणाचा आधार
संघाच्या शताब्दी वर्षात व्यक्तिमत्व विकासाला विशेष स्थान दिले जाईल. प्रत्येक नागरिकाचा व्यक्तिमत्व विकास म्हणजेच राष्ट्रनिर्माणाची मूलभूत गोष्ट आहे. व्यक्ती सुधारली तर समाज सुधारतो, आणि समाज सुधारला तर देश पुढे जातो.

हालचाल पहलगामच्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी सांगितले, की सरकार आणि सैन्य योग्य दिशेने उत्तर देतात, मात्र नागरिकांनीही सुरक्षा संदर्भात सजग राहणं महत्त्वाचं आहे.
भागवत यांचा संदेश स्पष्ट आहे – देशाला पुढे न्यायचे असेल, तर प्रत्येकाला आपले योगदान द्यावे लागेल. बदल, एकता आणि सकारात्मक विकास हेच समाज आणि देशाच्या मजबुतीचे गमक आहे.


Post a Comment

0 Comments